राजीव गांधी स्वीडिश कंपनीचे दलाल होते- विकीलीक्स

विकीलिक्सच्या नव्या खुलाशाने भारतीय राजकारणात भूकंप आला आहे. या वेबसाइटने दावा केला आहे की, राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनण्यापूर्वी जेव्हा पायलट म्हणून काम करत होते. तेव्हा ते एका स्वीडिश कंपनी साब स्कॉनियासाठी दलालीचे काम करत होते. तसेच माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: Apr 8, 2013, 01:22 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
विकीलिक्सच्या नव्या खुलाशाने भारतीय राजकारणात भूकंप आला आहे. या वेबसाइटने दावा केला आहे की, राजीव गांधी भारताचे पंतप्रधान बनण्यापूर्वी जेव्हा पायलट म्हणून काम करत होते. तेव्हा ते एका स्वीडिश कंपनी साब स्कॉनियासाठी दलालीचे काम करत होते. तसेच माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.
`विकिलीक्सा`नुसार राजीव गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ते इंडियन एअरलाईन्सचे वैमानिक होते. आपली नोकरी सांभाळून ते स्वीडनमधील `साब स्कासनिया` कंपनीचे एजेंट म्हणूनही काम करत होते. विकिलीक्संने हेही प्रसिद्ध केले आहे की, 70 च्या दशकात भारताला लढावू विमान विक्री करण्या चा `साब स्कानिया` कंपनीचा हेतू होता. परंतु तो साध्य होऊ शकला नाही.
विकिलिक्सचा हा खुलासा एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर राजकारणात याची चर्चा सुरू झाली आहे. ७० च्या दशकात साब स्कॉनिया कंपनी भारताला एक फाईटर प्लेन विकण्याचा विचार करत होते आणि त्या सौद्यात गांधी परिवार भाग घेईल . या सौद्यात राजीव गांधींची सक्रीय भूमिका होती. पण १९७५ साली दिल्ली स्थित दूतवासाकडून पाठवण्यात आलेल्या एका तारेतून ही गोष्ट समोर आली आहे की, तो सौदा पूर्ण झाला नव्हता.

राजीव गांधी पंतप्रधान होण्यापूर्वी बोफोर्स कंपनीकडून तोफा विकत घेण्याच्या सौद्यात दलाली करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तर फर्नांडिस यांनी आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून अमेरिकी गुप्तहेर एंजन्सी सीआईएकडून आर्थिक मदत मागितली होती असा खुलासा करण्यात आला आहे.