एका महिलेने घातले दुसऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर

जमिनीचा दाबा मिळविण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर टाकले. पण सुदैवाने ट्रॅक्टरखाली आलेली महिला वाचली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

ANI | Updated: Jul 22, 2015, 09:00 PM IST
एका महिलेने घातले दुसऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर title=

बिजनौर, उत्तर प्रदेश : जमिनीचा दाबा मिळविण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर टाकले. पण सुदैवाने ट्रॅक्टरखाली आलेली महिला वाचली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Media preview

जमिनीचा ताबा मिळविण्यावर दोन गटामध्ये हाणामारी झाली. यात काही महिला होत्या. त्यातील एका महिलेने कंबरेला पिस्तुल अडकविले होते आणि ती एका ट्रॅक्टरवर बसली होती. त्या महिलेने बिनधास्त ट्रॅक्टर चालवत अनेक झाडांची मोडतोड केली. तिला विरोध करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर तिने थेट टॅक्टर चालविले. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.