संस्थेला मिळालेल्या फंडचा चुकीचा वापर केला नाही - झाकीर नाईक

मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकने दहशतवादी संबंधित सहभाग असल्याचा आरोप चुकीचा ठरवला आहे. त्यांनी म्हटलं की, "हे आरोप चुकीचे आहेत की काही चुकीचे तत्व जे दहशतवादी संघटनांशी जोडले आहेत ते माझ्या भाषणामुळे प्रभावित झाले आहेत. जर मी दहशतवादाला प्रोत्यसाहन दिलं असतं तर आतापर्यंत लाखो दहशतवादी तयार केले असते.

Updated: Nov 28, 2016, 09:05 AM IST
संस्थेला मिळालेल्या फंडचा चुकीचा वापर केला नाही - झाकीर नाईक title=

नवी दिल्ली : मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकने दहशतवादी संबंधित सहभाग असल्याचा आरोप चुकीचा ठरवला आहे. त्यांनी म्हटलं की, "हे आरोप चुकीचे आहेत की काही चुकीचे तत्व जे दहशतवादी संघटनांशी जोडले आहेत ते माझ्या भाषणामुळे प्रभावित झाले आहेत. जर मी दहशतवादाला प्रोत्यसाहन दिलं असतं तर आतापर्यंत लाखो दहशतवादी तयार केले असते.

नाईकने म्हटलं की, 'लाखो समर्थकांमध्ये काही समाज विरोधी असू शकतात जे हिंसा करतात. पण ते तो संदेश नाही स्विकारत जो मी देतो. जर कोणी हिंसेचा मार्ग स्विकारतो तर तो मुस्लीम नाही. त्याला माझं समर्थन नाही.

इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घातल्यानंतर झाकीर नाईक म्हणतात की, 'फाऊंडेशनला मिळालेल्या फंडचा चुकीचा उपयोग नाही केला. आयआरएफला मागील ६ वर्षांमध्ये जवळपास ४७ कोटी रुपये मिळाले. याचा टॅक्स रिटर्न देखील भरला आहे, अशामध्ये बंदी घालण्याचा निर्णय हे राजकारण आहे. मी एनआयला मदतीसाठी अनेकदा प्रयत्न केले. पण कोणतंही उत्तर नाही मिळालं.'