झी स्पेशल : छोटा राजनच्या मदतीनं तपास यंत्रणांचं 'डी ऑपरेशन'

छोटा राजनला भारतात आणलं खरं... पण त्याला दिल्लीतच ठेवलं जाणार असल्यानं दाऊदच्या पायाखालची वाळू सरकलीय... त्यातच तपासयंत्रणांनी छोटा राजनच्या मदतीनं ऑपरेशन डी आखलंय... काय आहे हे ऑपरेशन डी, पाहूयात हा खास रिपोर्ट... 

Updated: Nov 7, 2015, 10:25 AM IST
झी स्पेशल : छोटा राजनच्या मदतीनं तपास यंत्रणांचं 'डी ऑपरेशन' title=

अजित मांढरे, नवी दिल्ली : छोटा राजनला भारतात आणलं खरं... पण त्याला दिल्लीतच ठेवलं जाणार असल्यानं दाऊदच्या पायाखालची वाळू सरकलीय... त्यातच तपासयंत्रणांनी छोटा राजनच्या मदतीनं ऑपरेशन डी आखलंय... काय आहे हे ऑपरेशन डी, पाहूयात हा खास रिपोर्ट... 

'काट्यानं काटा काढणे' हा एक कलमी कार्यक्रम सध्या केंद्रीय तपास यंत्रणांनी राबवायचं ठरवलंय. म्हणूनच की काय, छोटा राजनला मुंबईत न आणता दिल्लीतच ठेवलं गेलंय. कारण छोटा राजनच्या मदतीने पुन्हा एकदा 'ऑपरेशन डी' पूर्ण करण्याचा चंग केंद्रानं बांधल्याचं बोललं जातय. कारण...

अधिक वाचा - दाऊशी संबंध असलेल्या मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची नावे सांगितले राजनने

- छोटा राजनच्या मदतीनं दोन वेळा दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण पोलीस दलातील दाऊदच्या लोकांमुळे दोन्ही वेळा फसला.

- एकदा छोटा राजन, भरत नेपाळी आणि विक्की म्हलोत्रा यांच्या सहाय्यानं पाकिस्तानात घुसून  दाऊदला यमसदनी धाडण्याचा प्लान मुंबई पोलीस दलातील एका पोलीस टीपरमुळं फसला.

- असाच आणखी एक प्रयत्न झाला होता. पण याही वेळी दाऊदच्या भारतातील हस्तकांकडून मिळालेल्या टीपमुळे दाऊदला मारायला जाणा-यांना दिल्ली विमानतळावरच अटक करण्यात आली.

- त्यानंतर छोटा राजन, भरत नेपाळी, विक्की म्हल्होत्रा आणि छोटा राजन गॅंगने दाऊदला मदत करणा-या जवळपास १० ते १५ जणांची हत्या केली.

- यात बांधकाम व्यावसायिकांपासून वकिलांपर्यंत अनेकांचा समावेश होता.आणि ज्या पोलिसांना संपवणं शक्य नव्हतं, त्यांनी केलेल्या खोट्या एन्काऊंटरची प्रकरणे जगासमोर आणुन त्यांना कोर्टाच्या फे-यात अडकवण्यात आलं.

- अलिकडेच छोटा शकीलनं तीन महिन्यांपूर्वी छोटा राजनवर पुन्हा हल्ला केला होता, मात्र त्यातूनही तो बचावल्याची माहिती मिळतेय.

अधिक वाचा - राजनसाठी सुरक्षा यंत्रणांनी वापरली 'फिल्मी स्टाईल'!
 
खरं पाहता दाऊदचे एकेकाळचे कट्टर समर्थक आता त्याचे कट्टर विरोधक झालेत. 

- छोटा राजन दिल्ली सीबीआयच्या ताब्यात आहे.

- अरुण गवळी शिवसेना नगरसेवक जामसांडेकर हत्या प्रकरणी शिक्षा भोगतोय.

- अबू सालेम सुद्धा विविध प्रकरणात जेलची हवा खातोय.

- १९९३ बॉम्बस्फोटांची पोलिसांना आधीच माहिती देणारा मुस्तफा डोसा जेलमध्ये आहे.

- अश्विन नाईकने सध्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलय.

- ठाकूर परिवाराने देखील आपलं वेगळं साम्राज्य प्रस्थापित केलंय...

एकेकाळचे एकमेकांचे कट्टर विरोधक आज पुन्हा मित्र बनलेत. अरुण गवळीच्या नवरात्र उत्सवात छोटा राजन देवीला सोनं पाठवतो तर छोटा राजनच्या गणपती मंडळाला अरुण गवळीकडून मोठ्या भेट वस्तू येतात. शिवाय नाईक आणि ठाकूर कंपनी या दोन्ही ठिकाणी नित्य नियमाने भेट देतात. त्यामुळे हे सर्व दाऊद विरोधात एकवटलेत का? या चर्चेने आता जोर धरलाय.

छोटा राजनला दिल्लीत ठेवल्यानं त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही हे आता दाऊदच्याही लक्षात आलंय. राजन आणि तपास यंत्रणा हातात हात घालून काम करत असल्याच्या शंकेनं दाऊदची झोप उडालीय, एवढं निश्चित... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.