सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार! गृहकर्जाचा हप्ता वाढणार!

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदारांना बसणार असून त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) किमान तीन टक्के म्हणजेच ५०० रुपयांनी वाढणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Updated: Sep 23, 2013, 08:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदारांना बसणार असून त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) किमान तीन टक्के म्हणजेच ५०० रुपयांनी वाढणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो दरात वाढ केली. यामुळे बँकांना कर्ज महागले, पण याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्जदारांवरही झालाय.
या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महागणार आहे.
व्याजदरात पाव टक्क्याने तर ईएमआयमध्ये किमान ३ ते ५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. चलनवाढ रोखण्यात अपयश आल्यास रघुराम राजन वर्षअखेरपर्यंत रेपो दरात आणखी अर्ध्या टक्क्याने वाढ करण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.