काबूल बॉम्ब स्फोटात ८ ठार

तालिबानमधील दहशतवाद अजूनही धुमसतोय. काबूळमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात आठ जण ठार झालेत. हा हल्ला अफगाणीस्तान सरकारला धक्के देण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Updated: Aug 8, 2012, 12:47 AM IST

www.24taas.com, काबूल

तालिबानमधील दहशतवाद अजूनही धुमसतोय. काबूळमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात आठ जण ठार झालेत. हा हल्ला अफगाणीस्तान सरकारला धक्के देण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

अफगणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज  मंगळवार हा स्फोट रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने घडवून आणल्याची, माहिती पोलिसांनी दिली. काबूलचे पोलीस प्रमुख जनरल आयूब सालंगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पघमन जिल्ह्यात आज पहाटे पाचच्या सुमारास नागरिकांच्या मिनिबसला लक्ष्य  करण्यात आले.

या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी आहे. बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो तालिबानी संघटनेचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.