पाक गायिका गझला जावेदची हत्या

Last Updated: Tuesday, June 19, 2012 - 17:00

www.24taas.com, इस्लामाबाद

 

वायव्य पाकिस्तानातील पेशावर येथे प्रसिद्ध पश्तो गायिका गझला जावेद आणि तिच्या वडिलांची अज्ञात व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली.

 

गझला आणि त्यांच्या वडिलांवर अज्ञात व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. हत्या झाली त्यावेळी गझला एका ब्युटी पार्लरमधून बाहेर येते होते. या घटनेत त्यांची छोटी बहिण बालबाल बचावली आहे. हल्लेखोर एका मोटारसायकलीवर होते, ते गोळीबार करून पळून केले आहे.

 

अद्याप हा हल्ला कोणी केला हे समजलेले नसले तरी तालिबानी दहशतवाद्यांवर संशयाची सुई जात आहे. गेल्या वर्षांमध्ये  तालिबानकडून अनेक गायकांची आणि संगीतकारांची हत्या करण्यात आली आहे. संगीत हे गैर इस्लामी असल्याचे तालिबानने घोषीत करून हे हत्या सुरू केल्या असल्याचे बोलले जाते. दहशतवाद्यांच्या धमक्यांनंतर अनेक संगीततज्ञ्ज या भागातून दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहेत.

 

तसेच गझलाची हत्येचे कारण तिचा घटस्फोटीत पतीही असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गझलाचा दोन वर्षापूर्वी जावेद खान याच्याशी लग्न झाले होते. परंतु, पती-पत्नी तणावामुळे गझला माहेरी राहायला आली होती.

 

पाहा फोटोफीचर 

गायिका गझला जावेद यांना श्रद्धांजली

 

 

First Published: Tuesday, June 19, 2012 - 17:00
comments powered by Disqus