भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकमधून हॅक

भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकिस्तानातून हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Updated: Mar 4, 2014, 08:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकिस्तानातून हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भारत सरकारच्या तीन वेबसाईटसह आठवडाभरात पाकिस्तानी हॅकरने केलेला हा दुसरा सायबर हल्ला आहे.
डोमेनद्वारे पहिल्यांदाच या वेबसाईट हॅक केल्या आहेत. प्रत्येक वेबसाईटच्या नावामागे (डोमेन) एक आयटी अँड्रेस असतो.
सध्या आशिया चषकचे क्रिकेट सामने बांगलादेशात सुरू आहेत. रविवारी रात्री भारत-पाक क्रिकेट सामना संपताच हॅकरनी १0 ते १०.३० वाजताच्या कालावधीत http://www.nic.cd वेबसाईट हॅक केली.
हॅकर्सनी या नंतर अमॅझॉन, ऑडी, एव्हीजी, ईबे या मनी ट्रान्सफर वेबसाईटसह केंद्र शासनाच्या org.cd, gov.cd, govre. cd वेबसाईटचाही समावेश आहे.
मात्र हा घटनाक्रम लक्षात येताच इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) मुंबई युनिटमधील सायबर एक्स्पर्टने या वेबसाईट १५ मिनिटांतच रिकव्हर केल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.