अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये स्फोट, ११ ठार

जलालाबाद : अफगाणिस्तानच्या पूर्व सीमेवरील जलालाबाद शहर रविवारी सकाळी एका जबरदस्त बॉम्बस्फोटाने हादरले. 

Updated: Jan 17, 2016, 01:30 PM IST
अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये स्फोट, ११ ठार title=

जलालाबाद : अफगाणिस्तानच्या पूर्व सीमेवरील जलालाबाद शहर रविवारी सकाळी एका जबरदस्त बॉम्बस्फोटाने हादरले. जलालाबाद शहरात झालेल्या आत्मघातकी स्फोटात आतापर्यंत ११ जण ठार तर २० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 





मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट काउन्सिल नेता अब्दुल्ला सीनवारी यांच्या घराजवळ झाला.



यापूर्वी गेल्या बुधवारीच जलालाबाद येथील पाकिस्तानी दूतावासाजवळ एक आत्मघातकी हल्ला झाला होता. यात सात जणांचा मृत्यू झाला होता.