सावधान! तुमचा बॉस तुमच्या 'फेसबुक' प्रोफाईलवर लक्ष ठेवू शकतो

बॉसने 'फेसबूक'च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवल्याने ते कोणत्या प्रकारचा कायदा तोडत नाहीत, असा निर्वाळा इटलीच्या सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Updated: May 29, 2015, 07:20 PM IST
सावधान! तुमचा बॉस तुमच्या 'फेसबुक' प्रोफाईलवर लक्ष ठेवू शकतो title=

रोम : बॉसने 'फेसबूक'च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवल्याने ते कोणत्याही प्रकारचा कायदा मोडत नाहीत, असा निर्वाळा इटलीच्या सुप्रीम कोर्टाने दिलाय.

कोर्टासमोर आलेल्या एका प्रकरणात एका प्रिंटरने आपल्या कर्मचाऱ्याला एका महिलेशी फेसबुकवर चॅट करत असल्याचं कारण देत कामावरून काढून टाकलं होतं.

खरं म्हणजे, संबंधित महिलेचं फेक प्रोफाईलही प्रिंटर बॉसनंच तयार केलं होतं. फेक महिला प्रोफाईवर संबंधित कर्मचारी फेसबुक मेसेंजरवरून जवळपास १५ मिनिटं चॅटिंग करत होता. याच दरम्यान प्रिटिंग वर्क्समध्ये जाम झाला होता. तो पूर्ववत करणं त्या कर्मचाऱ्याला शक्य झालं नाही. 

कोर्टानं या प्रकरणात निर्णय देताना स्पष्ट केलंय की, प्रिंटरने बनावट प्रोफाईल तयार करणं आणि कर्मचाऱ्याला नोकरीवरुन कमी करणं... यात काहीही गैर नाही. असा करण्याचा त्याला अधिकार आहे. वारंवार सुचना देऊनही कर्मचाऱ्याचं बेजबाबदार वर्तन सुरुच होतं.

याच वेळी, कर्मचाऱ्यांवर मोबाईल फोनच्या माध्यमातून नजर ठेवणं योग्य आहे. या कर्मचाऱ्याचे कामाच्या वेळी अनेक फेसबूक मेसेजेस सापडले. त्यामुळे ही सर्वस्वी कर्मचाऱ्याचीच चूक असल्याचे कोर्टानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.