... आणि त्याच्या १७ गर्लफ्रेंड असल्याचा झाला पर्दाफाश

चीनमध्ये एका व्यक्तीनं तब्बल १७ मुलींची फसवणूक केली. ही घटना उघड झाली एका कार अपघातामुळे. कार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या पाहणीसाठी एक-दोन नाही तर तब्बल १७ प्रेयसी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

Updated: Apr 8, 2015, 03:23 PM IST
... आणि त्याच्या १७ गर्लफ्रेंड असल्याचा झाला पर्दाफाश title=

बीजिंग: चीनमध्ये एका व्यक्तीनं तब्बल १७ मुलींची फसवणूक केली. ही घटना उघड झाली एका कार अपघातामुळे. कार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या पाहणीसाठी एक-दोन नाही तर तब्बल १७ प्रेयसी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

दक्षिण चीन पोस्टनुसार होनन सुबेच्या चीनगिशा शहराशी संबंधीत युआन नामी या व्यक्तीच्या एकाच वेळी १७ गर्लफ्रेंड्स होत्या आणि त्यातील एक गर्लफ्रेंड युआनच्या मुलाची आई सुद्धा आहे. 

युआन अनेक वर्षांपासून आपल्या प्रत्येक प्रेयसीला आपल्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी कुणी मुलगी नाही, असं सांगून फसवायचा. मात्र ही फसवणूक पुढे आली जेव्हा डॉक्टरांनी फोन करून युआनच्या गर्लफ्रेंडसोबत संपर्क केला. 

त्यातील एक गर्लफ्रेंड जाउली १८ महिन्यांपासून युआनच्या प्रेमात पडली. तिनं एका चीनी वृत्तपत्रासोबत बोलतांना सांगितलं, 'जेव्हा मी ऐकलं तो हॉस्पिटलमध्ये आहे, तेव्हा मी खूप चिंतित झाली. मात्र जेव्हा मी दररोज एकाहून एक सुंदर तरूणीला युआनला भेटतांना पाहिलं तेव्हा मला खरं काय ते समजलं. तेव्हा मी त्याच्यासाठी थांबू शकत नव्हती.'

जाउली नुसार, अनेक महिलांनी तर युआनला आर्थिक मदत सुद्धा केली आहे. एक महिला तर नऊ वर्षांपासून युआनला पैसे पुरवतेय. त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडनं मीडियाला सांगितलं की, ते तर लग्नाची तयारी करत होते. 

युआनच्या १७ गर्लफ्रेंडचे किस्से चीनमध्ये सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. मात्र सगळे काही युआनवर टीका करत नाहीय. काही जण तर युआनचं कौतुक करतायेत, त्यानं एकाच वेळी १७ गर्लफ्रेंडना सांभाळलं म्हणून... 

आता युआन होईल ते होईल... गर्लफ्रेंड्स त्याच्या सोबत काय करतील ते करतील. पण पोलिसांनी मात्र त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.