डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी

जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

Updated: Apr 20, 2016, 05:40 PM IST
डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी title=

लंडन : जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

जोआना ही आई होऊ शकत नाही. त्यामुळे ती अनेक दिवसांपासून या आजाराला तोंड देत मानसिकरित्या देखील खचली होती पण आता डॉक्टरांनी सर्जरी करुन तिच्यासाठी नवं आयुष्य दिलं आहे. ती आता शरीर संबंध ही ठेवू शकणार आहे. तिचा एक बॉयफ्रेंड देखील आहे आणि ती आता खूप आनंदी असल्याचं तिने म्हटलं आहे.