नेपाळ भूकंप पीडितांना मदतीसाठी पुढे सरकावलं 'फेसबूक'

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकनं आज आपल्या होमपेज वर 'डोनेशन'चं बटन दिलं आहे. याद्वारे यूजर नेपाळ भूकंप पीडितांसाठी मदतीसाठी पैसे पाठवू शकतो. याशिवाय फेसबूकनं १२,६८,२२,९०० रुपयांची मदत देऊ केली आहे. 

Updated: Apr 28, 2015, 02:58 PM IST
नेपाळ भूकंप पीडितांना मदतीसाठी पुढे सरकावलं 'फेसबूक' title=

काठमांडू: सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूकनं आज आपल्या होमपेज वर 'डोनेशन'चं बटन दिलं आहे. याद्वारे यूजर नेपाळ भूकंप पीडितांसाठी मदतीसाठी पैसे पाठवू शकतो. याशिवाय फेसबूकनं १२,६८,२२,९०० रुपयांची मदत देऊ केली आहे. 

फेसबूकनं सांगितले की, युजर्स नेपाळमधील भूकंप पीडित नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. तसंच भूकंपग्रस्त भारत आणि बांग्लादेशलाही मदत केली जात आहे. फेसबूकनं स्पष्ट केलं आहे की, भूकंपग्रस्तांना इंटरनॅशनल मेडिकल कॉर्प्स जितकी मदत करणार आहे, तेवढीच मदत फेसबूकतर्फे केली जाईल. 

फेसबूकनं आज सांगितलं की, इंटरनॅशनल मेडिकल कोर्प्सला दान करा आणि फेसबूक तुम्ही केलेल्या मदती एवढीच मदत भूकंपग्रस्तांसाठी करेल. तसंच फेसबूकनं हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांची सूचना देण्यासाठी 'सेफ्टी चेक'ची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा यूजरला मित्र अथवा कुटुंबाला सुचित करण्यासाठी मदत करते. फेसबूकच्या इंजिनिअर्सनी ही सुविधा २०११साली जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि त्सुनामीनंतर विकसीत केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.