मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Updated: Jun 3, 2016, 10:25 PM IST
मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...  title=

नवी दिल्ली : फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

कॅन्सरनं पतीचा मृत्यू

'रॉयटर्स' या एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, मारियाना गोमेज या ३० वर्षीय स्पॅनिश महिलेच्या पतीचा गेल्या वर्षी कॅन्सरनं मृत्यू झाला होता.

केमोथेरेपी सुरु करण्यापूर्वी महिलेच्या पतीनं आपले शुक्राणू फ्रीज करून ठेवले होते. या दरम्यान, मारियाना आणि तिचा पती पॅरिसमध्ये राहत होते. यामुळे, या प्रकरणाची सुनावणी फ्रान्सच्या न्यायालयासमोर पार पडली. 

फ्रान्सचा कायदा आड

फ्रान्समध्ये ज्या महिला प्राकृतिक पद्धतीनं गर्भधारणा करू शकत नाहीत अशाच महिलांना तांत्रिक पद्धतीनं गर्भधारणेची परवानगी आहे.

या प्रकरणावर निकाल देताना न्यायाधिशांनी मारियाना हिला शुक्राणू स्पेनला घेऊन जाण्याची परवानगी दिलीय.