जर्मनीत सिनेमा हॉलमध्ये गोळीबार

जर्मनीमध्ये फ्रँडफर्ट येथे एका मल्टिप्लेक्समध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बुरखाधारी व्यक्तीनं स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता मल्टिप्लेस्कमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. यामध्ये किमान 25 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक मीडियानं दिलीये.

Updated: Jun 23, 2016, 10:44 PM IST
जर्मनीत सिनेमा हॉलमध्ये गोळीबार title=

मुंबई : जर्मनीमध्ये फ्रँडफर्ट येथे एका मल्टिप्लेक्समध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बुरखाधारी व्यक्तीनं स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता मल्टिप्लेस्कमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. यामध्ये किमान 25 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक मीडियानं दिलीये.

पोलिसांकडून मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरानं अंधाधुंद गोळीबार करून मल्टिप्लेक्समध्ये लपून बसला. अखेर पोलिसांनी त्याला ठार केल्याची माहिती तेथील स्थानिक मिडियाने दिली आहे.