रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध

रशियाचं प्रवासी विमान स्फोटानं उडवून देण्यासाठी वापरलेल्या बॉम्बचे फोटो 'आयसिस'नं प्रसिद्ध केलेत.. एका कोल्ड्रिंकच्या टीनमध्ये स्फोटक लपवल्याचा दावा 'आयसिस'कडून करण्यात आलाय.

Updated: Nov 19, 2015, 09:17 AM IST
रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध title=

मॉस्को: रशियाचं प्रवासी विमान स्फोटानं उडवून देण्यासाठी वापरलेल्या बॉम्बचे फोटो 'आयसिस'नं प्रसिद्ध केलेत.. एका कोल्ड्रिंकच्या टीनमध्ये स्फोटक लपवल्याचा दावा 'आयसिस'कडून करण्यात आलाय.

आणखी वाचा - आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

शर्म-अल-शेख विमानतळावरील सुरक्षा त्रुटींचा फायदा घेत ही स्फोटकं विमानापर्यंत पोहचवण्यात आली होती.. ३१ ऑक्टोबरला इजिप्तच्या सिनाई भागात रशियन विमान कोसळलं होतं आणि आयसिसनं या घटनेची जबाबदारी घेतली होती.. या विमानातून प्रवास करणाऱ्या २२४ नागरिकांचा बळी गेला होता. 

दोषींना कुठल्याही परिस्थितीत संपवणारच अशी भूमिका रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लामिदिर पुतीन यांनी मांडलीय.. रशियाचं विमान पाडणा-या प्रत्येकाला शोधून शोधून संपवू असा निर्धार पुतीन यांनी केलाय.. 

आणखी वाचा - जगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.