अबब.. एक राजा, 100 बायका आणि 500 मुलं...

तुम्ही गोष्टींमध्ये वाचलं असेल की एक नगर असतं, तिथल्या राजाला खूप राण्या आणि खूप मुलं असतात. पण विचार करा खरंच असं असेल तर.. हो. ही काल्पनिक गोष्ट नसून आफ्रिकेतील सत्यकथा आहे. आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये बुफेट नावाच्या गावातील 11वा राजा अबुम्बी(दुसरा) याला 100 राण्या आणि 500 मुलं आहेत. 

Updated: Jun 23, 2015, 07:07 PM IST
अबब.. एक राजा, 100 बायका आणि 500 मुलं... title=
नवी दिल्ली : तुम्ही गोष्टींमध्ये वाचलं असेल की एक नगर असतं, तिथल्या राजाला खूप राण्या आणि खूप मुलं असतात. पण विचार करा खरंच असं असेल तर.. हो. ही काल्पनिक गोष्ट नसून आफ्रिकेतील सत्यकथा आहे. आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये बुफेट नावाच्या गावातील 11वा राजा अबुम्बी(दुसरा) याला 100 राण्या आणि 500 मुलं आहेत. 
 
आफ्रिकेतील या गावात अनेक लग्न करण्याची प्रथा आहे, तसेच किती लग्न करावी याला बंधन नाही. बुफेट ही जगातील सर्वाधिक धोकादायक जागांपैकी एक मानली जाते. 
 
प्रचलित प्रथेनुसार जेव्हा इथल्या राजाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा उत्तराधिकारी त्याच्या राण्यांचा सांभाळ करतो. राजा अबुम्बीने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 72 राण्यांना आपल्या सोबत ठेवलं असून त्यांच्यापासून त्याला 500 मुलं आहेत. आफ्रिकेत राण्यांना एक चांगला प्रवक्त्या मानलं जातं. त्या सुशिक्षीत असतात आणि त्यांना बऱ्याच भाषा येत असतात. त्यामुळे स्थानिक संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी सहाय्य करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.