मलालाची तालिबान्यांना जोरदार चपराक...

पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी पंधरा वर्षीय कार्यकर्ती मलाला युसुफझईने तालिबान्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय... तिनं पुन्हा एकदा ब्रिटनमधल्या शाळेत जाणं सुरु केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2013, 09:27 AM IST

www.24taas.com, लंडन
पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी पंधरा वर्षीय कार्यकर्ती मलाला युसुफजईने तालिबान्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय... तिनं पुन्हा एकदा ब्रिटनमधल्या शाळेत जाणं सुरु केलंय.
तालिबान्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून सावरल्यानंतर शाळेत जाऊन तिनं दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलंय. ब्रिटनच्या एजबस्टन हायस्कूल या मुलींच्या शाळेमध्ये तिचा नवव्या इयत्तेतला पहिला दिवस अगदी मजेत गेला. पहिल्या दिवसानंतर खूप उत्साहित असून शाळेत पुन्हा येण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया मलालानं दिलीय. तसंच जगातल्या सर्व मुलींना शिक्षणाची समान संधी मिळायला हवी, असंही या चिमुरडीला वाटतंय. यावेळी पाकिस्तानातल्या वर्गमैत्रिणींची कमतरता जाणवत असल्याचं सांगायलाही मलाला विसरली नाही.

पाकमधल्या स्वात खोऱ्यातून शाळेतून घरी परतत असताना तालिबानी दहशतवाद्यांनी मलालावर हल्ला करत डोक्यात गोळी झाडली होती.