पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी 'मिस अमेरिका'!

अमेरिकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय वंशाची मिस अमेरिका नीना दावुलुरी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. 

Updated: Sep 12, 2014, 08:29 AM IST
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी 'मिस अमेरिका'! title=

नवी दिल्ली : अमेरिकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय वंशाची मिस अमेरिका नीना दावुलुरी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. 

या महिन्याच्या अखेरीस मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कसर राहिली जाऊ नये, यासाठी अनेक सूचना देण्यात आल्या. यासाठी अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे लोकही मागे नाहीत. 

28 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कच्या मेडियन स्क्वायर गार्डनमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचं संचालन मिस अमेरिका नीना दावुलुरी करणार आहे. तर भारतीय वंशाचेच प्रसिद्ध अँकर हरी श्रीनिवासन या कार्यक्रमाचं आयोजकपद संभाळताना दिसतील. 

नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात 20 हजारांहून जास्त भारतीय वंशाचे लोक सहभागी होणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.