नेपाळमधील मृतांची संख्या १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता

विनाशकारी भूकंपात ढासळलेल्या नेपाळमधील मृतांची संख्या आता १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नेपाळच्या सेनाप्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केलीय.

Updated: May 1, 2015, 07:00 PM IST
नेपाळमधील मृतांची संख्या १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता  title=

काठमांडू : विनाशकारी भूकंपात ढासळलेल्या नेपाळमधील मृतांची संख्या आता १५ हजारांवर पोहचल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. नेपाळच्या सेनाप्रमुखांनी ही शक्यता व्यक्त केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपात आत्तापर्यंत सहा हजारांहून अधिक लोक मारले गेलेत तर जवळपास ११ हजार लोक जखमी झालेत.

गुरुवारी पाऊस सुरू असतानाच ढिगाऱ्याखालून एका तरुणाला आणि एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं होतं. एका मोठ्या भयंकर शांततेनंतर यानंतर इथं एक उमेदीचा किरण दिसून आला. १५ वर्षांचा पेम्बा लामा याला सात मजली इमारतीखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अजूनही काही जणांना वाचवण्यात यश येऊ शकेल, याबद्दल आशा वाढलीय. भक्तपूरातही शहरातही ढिगाऱ्याखालून एका चार महिन्यांच्या चिमुरड्याला जिवंत बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासांनंतर जवळपास ३० वर्षांच्या कृष्णादेवी या महिलेलाही बाहेर काढण्यात आलं. काठमांडूच्या मुख्य बस टर्मिनल जवळच्या भागात ही महिला ढिगाऱ्याखाली दबलेली होती. 

अजूनही बचावपथक सुदूरच्या डोंगरी भागात पोहचण्यासाठी सघर्ष करतंय. पाऊस आणि भूस्खलनामुळे इथं बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत. आज सकाळीही पाऊस असल्याकारणानं बचाव पथकाची हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकले नाहीत. देशात निराशा वाढत चाललीय. लोकांना पोलिसांशीच झगडतानाची तसं खाण्यापिण्यासाठी एकमेकांशी झगडण्याची दृश्यं अनेक ठिकाणी नजरेस पडत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.