भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या हाफिज सईदचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

जमात-उद-दावा (JuD)चा चीफ आणि मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद आता भारताविरुद्ध आणि दहशतवादी कारवायांबद्दलची गरळ ओकू शकणार नाही. कारण त्याचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं गेलं असल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Dec 8, 2014, 05:38 PM IST
भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या हाफिज सईदचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड title=

नवी दिल्ली: जमात-उद-दावा (JuD)चा चीफ आणि मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद आता भारताविरुद्ध आणि दहशतवादी कारवायांबद्दलची गरळ ओकू शकणार नाही. कारण त्याचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं गेलं असल्याची माहिती मिळतेय. 

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला हाफिज सईद ट्विटरवर चांगला ऍक्टिव्ह असतो, भारताविरुद्ध अनेक भाषण आणि वक्तव्य करत असतो. 

सईदचे अनेक ट्विट्स प्रक्षोभक आणि वादग्रस्त असतात, वरवर पाहता भारत विरोधी भावनेचा प्रसार आणि दहशतवादी आणि हिंसा वाढविण्याचा त्याचा उद्देश असल्याचं ट्विट्सवरून दिसून येतं. 

नुकतं ५ डिसेंबरला केलेल्या सईदच्या ट्विटमुळं त्यावर ही कारवाई करण्यात आलीय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.