उत्तर कोरियाने हँगओव्हर न होणारी दारू तयार केल्याचा केला दावा

सेऊल (दक्षिण कोरिया) : आपल्या काही ना काही भयानक कारनाम्यांनी चर्चेत असणारा उत्तर कोरिया आता अजून एका कारणाने चर्चेत आला आहे.

Updated: Jan 20, 2016, 10:04 PM IST
उत्तर कोरियाने हँगओव्हर न होणारी दारू तयार केल्याचा केला दावा title=

सेऊल (दक्षिण कोरिया) : आपल्या काही ना काही भयानक कारनाम्यांनी चर्चेत असणारा उत्तर कोरिया आता अजून एका कारणाने चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात हायड्रोजन बॉम्बचा प्रयोग केल्याचे दावा केल्यावर आता उत्तर कोरियाने आता प्यायल्यावर हँगओव्हर न होणारी दारू तयार केल्याचा दावा केला आहे. 

उत्तर कोरियाचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या 'प्‍योगयांग टाइम्‍स'ने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे. 'कोर्यो लिकर' असे नाव या दारूला देण्यात आले आहे. 

ही दारू बनविण्यासाठी गिनसेंग आणि ग्‍लूटिनोस तांदूळ यांचा वापर करण्यात आला आहे. गिनसेंगमुळे दारूचा होणारा प्रभाव कमी होण्यास मदत होते. उत्तर कोरियाने यापूर्वीही गिनसेंगचा वापर करुन औषधे तयार केल्याचा दावा केला होता. 

इतकेच नव्हे तर तेथील सरकारी संस्थेने या दारुला 'क्वालिटी ऑफ मेडल' देऊन गौरव केला आहे. पण, उत्तर कोरियाच्या इतर दाव्यांप्रमाणेच या दाव्यातही किती तथ्य असेल, हा मोठा प्रश्न आहे.