ओबामांचा कुत्राही हिट...

ओबामा यांचे कौटुंबिक फोटोच नाही तर त्यांचा लाडका कुत्राही सोशल वेबसाईटवर हिट झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 10, 2012, 12:48 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना मिठी मारली आणि हाच क्षण एका फोटोच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंग साईटसवर पोहचला आणि प्रचंड हिट झाला. पण फक्त ओबामा यांचे कौटुंबिक फोटोच नाही तर त्यांचा लाडका कुत्राही सोशल वेबसाईटवर हिट झालाय.
ओबामांचा फॅमिली मेम्बर असलेला बो कुत्र्याचा फोटो सोशल साईटसवर चांगलाच गाजतोय. आत्तापर्यंत या फोटोला भरपूर शेअर आणि लाईकही मिळालेले आहेत. बो हा पोर्तुगिज वॉटर प्रकाराचा कुत्रा आहे. हा कुत्रा ओबामा यांनी आपल्या मुलींना गिफ्ट दिला होता.
बऱ्याचदा ओबामा आपल्या भाषणातून ‘बो’विषयी चर्चा करतात. ‘बो हा माझ्या सासूपेक्षाही चार्मिंग आहे… तो माझ्या ऑफिसपर्यंत येऊ शकतो, पण बिछान्यापर्यंत नाही’ असं मजेशीर वक्तव्यही ओबामांनी एकदा केलं होतं.