अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता

रशियानं पाठवलेलं एम-२७एम अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे हे अवकाशयान सोडलं होतं, मात्र यात २४ तासांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाशातच भरकटलेले हे यान झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

PTI | Updated: Apr 30, 2015, 10:04 AM IST
अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता title=

मॉस्को : रशियानं पाठवलेलं एम-२७एम अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे हे अवकाशयान सोडलं होतं, मात्र यात २४ तासांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाशातच भरकटलेले हे यान झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

कझाकस्तानातील बैकानूर येथील प्रक्षेपणस्थळावरून मंगळवारी हे यान सोडण्यात आलं होतं. मानवरहित असलेल्या या यानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्याला असलेल्या अंतराळवीरांसाठी इंधन, प्राणवायू, पाणी तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. 

मात्र, काही तासांतच रशियन अवकाश संस्थेशी त्याचा संपर्क तुटला. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही यानाशी संपर्क होऊ शकलेला नाही. परिणामी हे यान  भरकटलेल्या अवस्थेत अवकाशात फिरत असून ते झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत आहे. ते नेमके कोठे कोसळेल याचा अंदाज अद्याप वर्तवता आलेला नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.