भारतानं पाठवलेली मिठाई पाकनं माघारी धाडली

भारत - पाकिस्तान दरम्यान शुक्रवारी फ्लॅग मिटिंग पार पडली. भारताकडून बीएसएफच्या 14 ऑफिसर्स आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून 14 ऑफिसर्सनं या मिटिंगमध्ये सहभाग घेतला होता. जवळपास साडे तीन तास ही बैठक सुरू होती.

Updated: Aug 30, 2014, 05:12 PM IST
भारतानं पाठवलेली मिठाई पाकनं माघारी धाडली title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान शुक्रवारी फ्लॅग मिटिंग पार पडली. भारताकडून बीएसएफच्या 14 ऑफिसर्स आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून 14 ऑफिसर्सनं या मिटिंगमध्ये सहभाग घेतला होता. जवळपास साडे तीन तास ही बैठक सुरू होती.

दोन्ही पक्षांकडून अशा बैठकी सुरू राहतील, असा निर्णय घेण्यात आला. तरीही, यावेळी बीएसएच्या 'डीजीं'नी पाठवलेली मिठाई पाकिस्तान पक्षानं अस्वीकार केली.

वारंवार सीझफायरचं उल्लंघन झाल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव कायम आहे. हा तणाव कमी करण्यासाठी बीएसएफ आणि पाक रेंजर्सनं सेक्टर कमांडर लेव्हलवर फ्लॅग मीटिंगचा निर्णय घेतला होता.

आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आरएस पुराच्या सुचेतगड क्षेत्रात ही फ्लॅग मीटिंग पार पडली. दुपारी 3.30 वाजता सुरु झालेली ही बैठक संध्याकाळपर्यंत सुरू होती. सीझफायरच्या मुद्द्यावर ही आत्तपर्यंत झालेली तिसरी फ्लॅग मिटिंग आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.