'प्रजासत्ताक दिनी' असे पाहुणे येती...!

भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.   

Updated: Nov 21, 2014, 10:24 PM IST
'प्रजासत्ताक दिनी' असे पाहुणे येती...! title=

मुंबई : भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.   

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण पाठवलं होतं. खुद्द मोदींचं सोशल वेबसाईट अकाऊंट हॅन्डल करणाऱ्या पीएमओनंच आज ट्विटरवरून ही माहिती दिलीय. 

‘आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्याला आपले मित्र येतील, अशी आशा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येणारे ते पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरतील’ असं मोदींच्या ट्विटरवर अकाऊंटवरून म्हटलं गेलं. 

त्यानंतर, थोड्याच वेळात मोदींचं हे निमंत्रण ओबामांनी स्वीकारल्याची माहिती व्हाइट हाऊसमधून देण्यात आलीय. जानेवारी २०१५ मध्ये ओबामा भारताचा दौरा करतील, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा परिषदेनं सांगितलंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याचा हा पहिलाच प्रसंग असणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री पर्वाचा हा सुवर्णाध्याय असल्याचं मानलं जातंय. 

नुकताच काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसचा पाहुणचार घेतला होता. आता, बराक ओबामा हे भारताचा आणि पंतप्रधानांचा पाहुणचार स्विकारणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.