भारतातून शिव-पार्वतीची मूर्ती चोरी, अमेरिकेत जप्त

अमेरिकेत चोल कालीन ऐतिहासिक शिव-पार्वतीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे. ही मूर्ती भारतातून चोरी झाली होती.

Updated: Nov 20, 2015, 01:02 PM IST
भारतातून शिव-पार्वतीची मूर्ती चोरी, अमेरिकेत जप्त title=

 वॉशिंग्टन : अमेरिकेत चोल कालीन ऐतिहासिक शिव-पार्वतीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे. ही मूर्ती भारतातून चोरी झाली होती.

भारतीय मंदिरातून ही मूर्ती चोरीला गेली होती. भारतीय तस्कर सुभाष कपूर याने या मूर्तीची अमेरिकेला तस्करी केली होती.

इंडियाना विद्यापीठातून ही मूर्ती ताब्यात घेण्यात आली. सध्या ही मूर्ती अमेरिकन कस्टम विभागाकडे असून भारतात पाठवली जाणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.