सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनच्या मुलाला अटक

सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनचा 32 वर्षीय मुलाला पेइचिंग येथे अटक करण्यात आली आहे. त्याला त्याच्या एका तैवानी मित्रासोबत आम्ली पदार्थ जवळ ठेवल्यामुळे ताब्यात घेण्यात आलं आहे. 

Updated: Aug 18, 2014, 06:52 PM IST
सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनच्या मुलाला अटक

पेइचिंग: सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनचा 32 वर्षीय मुलाला पेइचिंग येथे अटक करण्यात आली आहे. त्याला त्याच्या एका तैवानी मित्रासोबत आम्ली पदार्थ जवळ ठेवल्यामुळे ताब्यात घेण्यात आलं आहे. 

फांग जुमिंगच्या नावाने ओळखला जाणारा जेसी चॅन हा सुद्धा एक अभिनेता आहे. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जेसी चॅन आणि त्याचा 23 वर्षीय मित्र 'काई को चेन-तुंग' जो तैवानचा अभिनेता आहे. ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

या दोघांनाही केव्हा ताब्यात घेण्यात आलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हे दोघे ही चीनच्या सोशल मीडिया साइट वाइबो वर खूपच अॅक्टिव आहेत. पण गेल्या मंगलवार पासून या दोघांनीही त्यावर काहीही पोस्ट केलेलं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.