अमेरिकेमध्ये शाळेत गोळीबार, सात विद्यार्थींनी ठार

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात एका माथेफिरूने अंधाधूद गोळीबार केल्याने सात विद्यार्थी ठार झाले आहेत. यात भारतीय वंशाची १९ वर्षीय विद्यार्थींनी ठार झाली. दरम्यान, माथेफिरू हा कोरियन वंशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated: Apr 9, 2012, 08:47 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

अमेरिकेतील  दक्षिण कॅलिफोर्नियात एका माथेफिरूने अंधाधूद गोळीबार केल्याने सात विद्यार्थी ठार झाले आहेत. यात भारतीय वंशाची १९ वर्षीय विद्यार्थींनी ठार झाली. दरम्यान, माथेफिरू हा कोरियन वंशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका धार्मिक शाळेतील विद्यार्थ्यांना एका माथेफिरूने भिंतीजवळ उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांने अंधाधूद गोळीबार केला. या गोळीबारात  सात विद्यार्थी जागीच ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर विद्यार्थ्यांमध्ये एक भारतीय वंशाच्या हविंदर कौर  विद्यार्थिनीचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.   ऑकलंड पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या ४३ वर्षीय माथेफिरू  व्यक्तीला अटक केली असून तो कोरियन वंशाचा असल्याचे सांगण्यात  येत आहे.

गोळीबार करणारा माथेफिरू अनेक दिवसांपासून शाळेत अनुपस्थित होता. सोमवारी सकाळी तो अचानक शाळेत आला. त्याने विद्यार्थ्यांना एका भिंतीजवळ रांगेत उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर बंदुकीने  बेधडक गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज आल्यावर शाळेत प्रचंड पळापळ झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.