भूकंप, त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी नवे उपकरण 'ब्रिंको'

भूकंप किंवा त्सुनामी आल्यास चेतावणी देणारे नवीन उपकरण 'ब्रिंको' वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या उपकरणाचा आकार छोटा असल्यामुळे ते आपल्या घरी सहज राहू शकेल. स्थानिक क्षेत्रात भूकंप किंवा त्सुनामी आल्यास त्याची चेतावणी हे 'ब्रिंको' देऊ शकेल. 

Updated: Jul 18, 2015, 04:13 PM IST
भूकंप, त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी नवे उपकरण 'ब्रिंको' title=

वॉशिंग्टन : भूकंप किंवा त्सुनामी आल्यास चेतावणी देणारे नवीन उपकरण 'ब्रिंको' वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या उपकरणाचा आकार छोटा असल्यामुळे ते आपल्या घरी सहज राहू शकेल. स्थानिक क्षेत्रात भूकंप किंवा त्सुनामी आल्यास त्याची चेतावणी हे 'ब्रिंको' देऊ शकेल. 

छोटे, गोल, सपाट असे दिसणारे हे उपकरण भूकंपाचा इशारा देते, ते एका मोबाईल अॅप्लिकेशनशी जोडलेले आहे. 'ब्रिंको' हे उपकरण आंतरराष्ट्रीय भूकंप नेटवर्कला जोडलेले आहे. जर स्थानिक क्षेत्रात भूकंप किंवा त्सुनामीची संभावना असेल तर आवाज, प्रकाश किंवा घंटेने वापर करणाऱ्यांना सिग्नल मिळू शकतो. 

5, 10 किंवा अगदी 30 सेकंदाच्या आधी ब्रिंको तुम्हाला भूकंपाची चेतावणी देऊ शकतं तसेच काही तासांच्या आधी सुनामीची चेतावणी देऊ शकतं. याचबरोबर पहिला झटका लागल्यावर अनुमान करू शकत कि दुसरा झटका कधी लागेल. 

जर झटका हलका असेल तर पिवळी दिवा पेटेल आणि जर झटक्याची तिव्रता अधिक असेल तर लाल दिवा पेटेल. या उपकरणाची विक्री पुढील वर्षाच्या जुलै पासून होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.