चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी

जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

Updated: Jan 1, 2015, 12:55 PM IST
चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी title=

शांघाय: जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

शांघाय या ठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानं ही घटना घडल्याचं चीनच्या सरकारी वृत्तवाहिन्यांकडून सांगण्यात आलं आहे. चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआनं दिलेल्या माहितीनूसार, ही घटना शांघायमधील चेन्यी स्क्वेअर या ठिकाणी रात्री स्थानिय वेळेनुसार रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. 

जमलेल्या लोकांमध्ये अचानक पळापळ सुरू झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडली असून नेमके कोणत्या कारणानं ही पळापळ सुरू झाली हे अद्याप समजलं नाहीय. तरी काही जण पाण्यात पडल्यानं त्यांना पाण्यातून बाहेर येण्याची पोलिसांनी विनंती करताच काही जणांनी त्या ठिकाणी पळापळ सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पळापळीनं अनेक जण जागीच दगावले तर अनेकांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.