अमेरिकेचा सीरियावर पुन्हा हल्ला

अमेरिकेनं पुन्हा एकदा सीरियावर हल्ला चढवलाय. मध्य आशियातल्या अमेरिकेन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकांवरून सिरियातमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय.

Updated: Apr 7, 2017, 10:13 AM IST
अमेरिकेचा सीरियावर पुन्हा हल्ला title=

वॉशिंग्टन : अमेरिकेनं पुन्हा एकदा सीरियावर हल्ला चढवलाय. मध्य आशियातल्या अमेरिकेन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकांवरून सिरियातमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय.

सीरियात दोनच दिवसांपूर्वी रासायनिक हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होतोय... आणि या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असतानाच अमेरिकेनं आता कठोर पाऊल उचचललंय. त्यामुळे पुन्हा एकदा मध्य आशियात युद्धाचं सावट गहिरं होऊ लागलंय.