व्हिएन्नाच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा ठार

ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या बंदुकधाऱ्याला पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार करण्यात यश मिळालेय.

Updated: Jul 3, 2016, 09:19 AM IST
व्हिएन्नाच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा ठार title=

व्हिएन्ना : ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या बंदुकधाऱ्याला पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार करण्यात यश मिळालेय.

बिल्ला सुपरमार्केटमध्ये रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एका माथेफिरु नागरिकाने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर तातडीने पोलिसांच्या कमांडो पथकाला पाचारण करण्यात आले. 

या कारवाईत त्या बंदुकधाऱ्याला ठार करण्यात यश मिळालेय. तर या कारवाईत दोन पोलीस जखमी झालेत.