टोपीसाठी महिलेची वाघाच्या पिंजऱ्यात उडी

फ्लोरिडातील पाम बीच प्राणीसंग्रहालयात टोपी काढण्यासाठी महिले वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेतली.

Updated: Apr 20, 2016, 09:43 PM IST

न्यूयॉर्क : फ्लोरिडातील पाम बीच प्राणीसंग्रहालयात टोपी काढण्यासाठी महिले वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेतली. स्टेसी असं 38 वर्षीय महिलेचं नाव आहे. 

प्राणीसंग्रहालयात वाघाचा पिंजऱ्याच्या जागेत पडलेली टोपी काढण्यासाठी या महिलेने आपला जीव धोक्यात घातला. ही महिला बाहेर येण्यास सफल झाली, मात्र इतर पर्यटकांनी नंतर तिची कान उघाडणी केली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ही महिला खाली उतरलेली दिसत आहे. टोपी घेऊन पुन्हा भिंतीवर चढून जाताना दिसत आहे.