`द लंचबॉक्स`ची अमेरिकेत रेकॉर्डब्रेक कमाई

भारतीय सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले, बाजारात प्रोड्यूसरची कमाई चांगलीच होते. पण परदेशात देखील भारतीय सिनेमांना मोठं बाजार खुलं आहे.

Updated: May 12, 2014, 06:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले, बाजारात प्रोड्यूसरची कमाई चांगलीच होते. पण परदेशात देखील भारतीय सिनेमांना मोठं बाजार खुलं आहे.
भारतीय सिनेमाच्या कमाईत अमेरिकेचाही एक महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अशाच एका छोट्या सिनेमाने अमेरिकेत स्वत:ची चांगलीच छाप पाडलीय.
बॉक्स ऑफिसने दिलेल्या आकडेवारीनुसार, `द लंचबॉक्स` सिनेमाने अमेरिकेत २७ लाख डॉलरची कमाई केलीयं. या मुव्हीचा रितेश बत्रा दिग्दर्शक असून, गुनीत मोंगा आणि अनुराग कश्यप निर्माता आहे.
`द लंचबॉक्स` ने इंग्लिश विंग्लिश १९ लाख डॉलर्सची कमाई केली आहे. तर अग्निपथने १९ लाख डॉलर आणि क्रिष-२ ने २२ लाख डॉलर या सिनेमांचा रेकॉर्ड तोडलाय.
तसेच द लंचबॉक्स लवकरच बर्फी, तलाश आणि गोलियों की रासलीला: रामलीला यांची २८ लाख डॉलरची कमाई तोडू शकेल, अशी अपेक्षा फिल्म जाणकारांकडून व्यक्त केली जातेय.
याशिवाय जिंदगी न मिलेंगी दोबारा आणि जब तक है जान या चित्रपटांनी ३१ लाख डॉलरची कमाई केलीय. मात्र द लंचबॉक्स बॉक्स ऑफिसवर अजून किती कमाई करेल हे बघावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.