कॅटरिनाच्या केसांवर तब्बल ५५ लाखांचा खर्च

रणबीर कपूरशी झालेल्या ब्रेकअपनंतर चर्चेत आलेली कॅटरिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या केसांमुळे. 'फितूर' या आगामी सिनेमासाठी कॅटरिनानं तिचे काळेभोर केस रंगवले असून त्यावर तब्बल ५० लाख रुपये खर्च केला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Updated: Jan 31, 2016, 07:28 PM IST
कॅटरिनाच्या केसांवर तब्बल ५५ लाखांचा खर्च title=

मुंबई : रणबीर कपूरशी झालेल्या ब्रेकअपनंतर चर्चेत आलेली कॅटरिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या केसांमुळे. 'फितूर' या आगामी सिनेमासाठी कॅटरिनानं तिचे काळेभोर केस रंगवले असून त्यावर तब्बल ५० लाख रुपये खर्च केला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

अभिषेक कपूर दिग्दर्शित 'फितूर' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. फर्स्ट लूक आणि ट्रेलरमुळं या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. त्यात आता कॅटरिनाच्या रंगरूपाची भर पडली आहे. 

'फितूर'मध्ये कॅटरिनाचा लूक परफेक्ट येण्यासाठी तिच्या केसांच्या रंगरंगोटीवर ५५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. अभिषेकने कॅटरिनाचे वेगवेगळ्या वेशभूषेतील अनेक फोटो काढले. तरी त्याच्या मनासारखा लुक येत नव्हता.

अखेर या कामासाठी त्यानं लंडनमधील एका खास हेअर स्पेशालिस्टची मदत घेतली केली. या हेअर स्पेशालिस्टकडून केसांच्या तपासणीसाठी कॅटरिनाला दर महिन्याला लंडनला जावं लागत होतं. तिच्या या लंडनवाऱ्यांचा सगळा खर्च निर्मात्याला करणं भाग होतं. हे सगळं बजेट ५० लाखांवर गेल्याचं समजत आहे. कॅटरिनाने मात्र या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.