पाकिस्तानच्या वेबसाईटला आमिरनं धाडलं नोटीस!

आमिर खाननं काही पाकिस्तानी वेबसाईटसना कायदेशीर नोटीस पाठवल्यात. आमिरच्या म्हणण्यानुसार, आपला सिनेमा 'पीके'संदर्भात धर्मावर आधारीत एक खोटा इंटरव्ह्यू या वेबसाईटसनं प्रसिद्ध केलाय. 

Updated: Jan 13, 2015, 11:11 AM IST
पाकिस्तानच्या वेबसाईटला आमिरनं धाडलं नोटीस! title=

नवी दिल्ली : आमिर खाननं काही पाकिस्तानी वेबसाईटसना कायदेशीर नोटीस पाठवल्यात. आमिरच्या म्हणण्यानुसार, आपला सिनेमा 'पीके'संदर्भात धर्मावर आधारीत एक खोटा इंटरव्ह्यू या वेबसाईटसनं प्रसिद्ध केलाय. 

'डीएसके लीगल'चे मॅनेजिंक पार्टनर आनंद देसाई यांनी आमिरच्या वतीनं हे नोटीस संबंधित वेबसाईटसना पाठवलंय. 'या इंटरव्ह्यूसाठी आमिरच्या नावाचा चुकीच्या पद्धतीनं वापर करण्यात आलाय... आपली फिल्म 'पीके'संदर्भात काही पाकिस्तानी वेबसाईटवर स्वत:चा इंटरव्ह्यू पाहून आमिरही दंग झाला होता. कारण त्यानं असा इंटरव्ह्यू कधी दिलाच नव्हता. हा खोटा इंटरव्ह्यू काही लोकांनी आपल्या वेबसाईटची रीडरशिप वाढविण्यासाठी चुकीच्या उद्देशानं छापलाय... पण, त्यामुळे आमिरच्या नावाची मात्र बदनामी होतेय'  असं आनंद देसाई यांनी म्हटलंय. 

'या पद्धतीनं आपल्या नावाचा चुकीचा उल्लेख करणं खूप गंभीर प्रकरण आहे... त्यामुळेच, आम्ही कायदेशीर पद्धतीनं हे प्रकरण हाताळायचा निर्णय घेतलाय. आज आम्ही आमिर खानच्यावतीनं संबंधित वेबसाईटसना नोटीस पाठवल्यात. आमिर मुंबईत परतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली जाईल' असं देसाई यांनी म्हटलंय. आमिर खान सध्या अमेरिकेत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.