आमिरला पाहायचा आहे पिंजरा

व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटानं मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले. या चित्रपटाची भुरळ आता अभिनेता आमिर खानलाही पडली आहे. 

Updated: Mar 25, 2016, 10:21 PM IST
आमिरला पाहायचा आहे पिंजरा title=

मुंबई: व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटानं मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले. या चित्रपटाची भुरळ आता अभिनेता आमिर खानलाही पडली आहे. 
पिंजरा हा चित्रपट मला बघायची इच्छा आहे, असं ट्विट आमिर खाननं केलं आहे. 

महान दिग्दर्शकांचे चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळत नाही, त्यामुळे पिंजरा पाहण्यासाठी मी जाणार आहे, तुम्हीही हा चित्रपट पाहा असं आवाहन आमिरनं ट्विटरवरून केलं आहे.  व्ही. शांताराम यांचा पिंजरा हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज झाला आहे.