पाक कलाकारांवरुन अभिजीत यांची करण जोहरवर टीका

बॉलिवूडमधील सिंगर अभिजीत भट्टाचार्य वक्तव्यामुळे वादात

Updated: Oct 3, 2016, 12:38 PM IST
पाक कलाकारांवरुन अभिजीत यांची करण जोहरवर टीका title=

मुंबई : बॉलिवूडमधील सिंगर अभिजीत भट्टाचार्य हा नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडतो. त्याने पुन्हा एकदा वादात्मक ट्विट केलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शनक करण जोहर याच्यावर टीका केली आहे. करण जोहर हा पाकिस्तानी कलाकार फवाद खानची महबूबा असल्याचं त्याने म्हटलंय.

अभिजीतने करण जोहरला टॅग करत #lovejihad आणि #KaranJohar हे हॅशटॅग लिहित ट्विट केलं आहे. अभिजीतने म्हटलं आहे की, 'आणखी एक लव्ह जिहाद. महबूबा करण जोहर डिप्रेशनमध्ये. कारण पाक प्रेमी फवाजने बिचारी पत्नी करण जोहरला धोका दिला.'

करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा रिलीज होणार की नाही यावर चर्चा सुरु आहे. या सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका आहे. उरी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी कलाकारांचा मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला आहे.