अभिनेता सलमान खान याची उलट तपासणी

हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.

Updated: Mar 27, 2015, 09:53 AM IST
अभिनेता सलमान खान याची उलट तपासणी title=

मुंबई : हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.

२००२ च्या हिट अँड रनप्रकरणी सलमान खानला आज सेशन्स कोर्टात हजर राहावं लागणार आहे. यापूर्वी सलमान खानने जोधपुर न्यायालयात चिंकारा शिकार प्रकरणातील खटल्याला हजर राखण्यासाठी ३ आठवड्यांचा वेळ मागत हिट अँड रन खटल्यावरील सुनावणी ३ आठवडे  स्थगित करण्याची मागणी केली होती.

मात्र, सलमानची ही मागणी कोर्टानं फेटाळलीये. २००२ हिट अॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान याची आज सरकारी पक्षातर्फे उलट तपासणी करण्यात येणार आहे. कारण हे हीट अॅण्ड रन प्रकरण आता अंतिम टप्प्यात आलंय. या प्रकरणातील सरकारी वकील आणि सलमान खानच्या वकीलांनी जवळपास ८० च्यावर साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शींची उलट तपासणी करण्यात आली आहे.

यात सलमान खानच्या त्यावेळेचा बॉडीगार्ड हवालदार रवींद्र पाटील याचा जबाब घेणा-या तत्कालीन तपास अधिका-याचाही समावेश आहे. शिवाय सलमान खानच्यारक्ताच्या नमुन्यांची चाचणी करणा-या फॉरेन्सीक कर्मचा-यांचीही उलट तपासणी केली गेली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.