ऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन

‘ए दिल है मुश्किल’मधील सिनेमाची चर्चा सुरु झालेय ती ऐश्वर्या - रणबीरच्या हॉट सीनने. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या हॉट सिनवरुन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

Updated: Aug 31, 2016, 08:09 AM IST
ऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन title=

मुंबई : ‘ए दिल है मुश्किल’मधील सिनेमाची चर्चा सुरु झालेय ती ऐश्वर्या - रणबीरच्या हॉट सीनने. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या हॉट सिनवरुन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे चित्रपटरसिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याआधीच या सिनेमाची चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून, चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ट्विटरवर अकाऊंटवर टीझर शेअर केला आहे. 

या सिनेमात रणबीर, अनुष्का आणि ऐश्वर्यासोबत 'लव्ह सीन' करताना नजरेस पडेल. रणबीर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबत इतकी हॉट आणि इंटिमेट दृश्ये साकारताना दिसत आहे. 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाची कथादेखील करणनेच लिहिली आहे. या वर्षी दिवाळीदरम्यान हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

पाहा सिनेमाचा टीझर