ब्रेकअपनंतर कॅटरिना सलमानच्या भेटीला

बॉलीवूडचे सुपरस्टार कॅटरीना-रणबीर दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण गेल्या आता त्यांच्य़ात कोणतंच नातं नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

Updated: Jan 17, 2016, 08:13 PM IST
ब्रेकअपनंतर कॅटरिना सलमानच्या भेटीला title=

मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार कॅटरीना-रणबीर दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण गेल्या आता त्यांच्य़ात कोणतंच नातं नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

कॅटरीना आणि रणबीर यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. कॅटरीनाने ६ वर्षापूर्वी रणबीरसाठी सलमानला सोडलं होतं. पण पुन्हा ती सलमानकडेच परतत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कॅटरीना आणि सलमान नुकतेच रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये भेटल्याने चर्चा रंगल्या आहेत.

कॅटरीना तिच्या आगामी चित्रपट 'फितुर'च्या प्रमोशनसाठी सध्या दिल्लीत आहे. रात्री उशिरा कॅटरीना हॉटेलमध्ये पोहोचली त्यानंतर काही वेळातच सलमानही तेथे पोहोचला. चित्रपट निर्माता कबीर खानही तेथे त्यावेळेस उपस्थित होता.