'एअरलिफ्ट'ने मोडला अक्षयच्याच 'रावडी राठोड'चा रेकॉर्ड

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

Updated: Jan 28, 2016, 04:25 PM IST
'एअरलिफ्ट'ने मोडला अक्षयच्याच 'रावडी राठोड'चा रेकॉर्ड  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसांपासूनच हा चित्रपट चांगली कमाई करतोय. क्या कूल है हम ३ ची स्पर्धा असतानाही हा चित्रपट यशस्वी झालाय.  

या चित्रपटाने वीकेंडमध्ये तब्बल ७२.५० कोटींचा गल्ला जमवलाय. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२.३५ कोटी कमावले होते. त्यानंतर शनिवारी १४.६०, रविवारी १७.३५, चौथ्या दिवशी सोमवारी १०.४० आणि पाचव्या दिवशी मंगळवारी १७.८० कोटींची कमाई केली. 

बुधवारी मात्र या नफ्यात घट झाली. बुधवारी केवळ सहा कोटींचा गल्ला जमावलाय. तरी आता पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण ७८ कोटींपेक्षा जास्त कमाई केलीये. अजून आठवडा संपायला अजून एक दिवस बाकी आहे. 

प्रभू देवाचे दिग्दर्शन असलेल्या 'रावडी राठोड'ने पहिल्या आठवड्यात ७९ कोटी कमावले होते. आता 'एअरलिफ्ट'ची कमाई पाहता अक्षयच्या विमानाने फार मोठी झेप घेतलीये असे म्हणायला हरकत नाही.