व्हायरल होतोय महिला सुरक्षेसंबधी अलियाचा व्हिडिओ

 स्टुडंट ऑफ द इअर फेम आलिया भट्टचे नाव ऐकले आपल्याला एक निरागस मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आलियाच्या निरागसचा वापर दिग्दर्शक विकास बहल याने समाजातील खूप गंभीर मुद्द्याच्या विरोधात केला आहे. 

Updated: Oct 21, 2014, 03:55 PM IST
व्हायरल होतोय महिला सुरक्षेसंबधी अलियाचा व्हिडिओ title=

नवी दिल्ली :  स्टुडंट ऑफ द इअर फेम आलिया भट्टचे नाव ऐकले आपल्याला एक निरागस मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आलियाच्या निरागसचा वापर दिग्दर्शक विकास बहल याने समाजातील खूप गंभीर मुद्द्याच्या विरोधात केला आहे. 

विकास बहल यांनी आलिया भट्टला घेऊन महिला सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. ‘गोइंग होम’ असे या शॉर्ट फिल्मचे नाव असून साधारण साडेपाच मिनिटांची ही फिल्म आहे. 
विकास बहल याने ‘क्वीन’ या चित्रपटाद्ववारे महिलांविषयीचा भावनात्मक मुद्दा उपस्थित केला होता. 

एक सामसूम रस्त्यावर  एकटी मुलगी कार चालवत आहे. कार चालविणारी मुलगी आलिया आहे. मुलीच्या आईचा फोन येतो, ती आईला सांगते की मी १० मिनिटात घरी पोहचते. येवढ सांगून ती फोन कट करते. अचानक तिची कार खराब होते. तेवढ्यात आणखी एक कार त्या ठिकाणी येते आणि त्यात पाच तरूण असतात. असे  ‘गोइंग होम’  व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे. 

वाईट भावनेने हे तरूण त्या मुलीजवळ येतात. तरूणी त्यांना तिची कार दुरूस्त करायला लावते. असे करत असताना ते काही चुकीचे करण्याचा विचार करत असतात पण त्यांचा प्रयत्न फसतो. कार दुरस्त होत नाही म्हणून ती पाच जणांकडून लिफ्ट मागते. 

घरी पोहचेपर्य़ंत रस्त्यात ते तरूण वाईट कृत्य करण्याचा विचार करतात. पण त्यांच्यातील एक मुलगा आपल्या मित्रांच्या कृत्यापासून अनभिज्ञ तरूणीने सांगितलेल्या रस्त्यावर गाडी चालवतो. शेवटी तरूणी आपल्या घरी पोहचते. 

कारमधून उतरताना ती सर्वांची गळाभेट घेते. इतर मित्रांना थॅक्यू म्हणते. हा व्हिडिओ समाजात पसरलेल्या गंभीर समस्येविरोधात सकारात्मक पाऊल उचलले आहे. 

या व्हिडिओच्या शेवटी प्रश्न विचारला गेला आहे, की आपण मुलींना असा समाज का देऊ शकत नाही. जो प्रत्यक्षात अशक्य आहे. पण एका मुलीच्या मनात असा चांगला समाज कुठेना कुठे  जिवंत आहे. त्याच्या भरोशावर ती अडचणीच्या वेळी आपल्याकडून मदत मागते. मग हे आपल्यावर आहे की आपण तिचा भरवसा तोडतो, की मजबूत करतो. 

पाहा हा भन्नाट व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.