अमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द

अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता. 

Updated: Apr 21, 2016, 03:48 PM IST
अमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द  title=

मुंबई : अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता. 

२० एप्रिल २०१६ रोजी अमन-वंदनाच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती. परंतु, यापूर्वीच अमनच्या वडिलांचा - कर्नल वाय के वर्मा यांच्या गाडीला अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे हा नियोजित विवाह सोहळा रद्द करण्यात आलाय. 

अमनचं सगळं कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं. त्यातच ही दु:खद घटना घडलीय. गेल्या वर्षी एका खाजगी सोहळ्यात अमन-वंदनाचा साखरपुडा पार पडला होता. 

अमन यापूर्वी बिग बॉस सीझन ९मध्ये दिसला होता.