व्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती

बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत. 

Updated: May 4, 2017, 08:35 AM IST
व्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती title=

मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत. 

या सिनेमातली गणेश आरती या सिनेमाचं मुख्य आकर्षण ठरतेय. कारण, ही गणेश आरती खुद्द बीग बींच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. 

नुकताच सिनेमाचा एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी गायलेली आरती प्रेक्षकांना विशेष भावलीय. यात दिसणारं गणपती विसर्जनाचं शूट मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर  करण्यात आलंय. 

'सरकार ३'मध्ये सुभाष नागरे या जखमी वाघाचा... जो आपल्या मुलाच्या (अभिषेक बच्चन) हत्येचा बदला घेण्यासाठी धडपडतोय, अशा एका बापाच्या भूमिकेत बीग बी दिसणार आहेत. सिनेमात नवी एन्ट्री घेतलीय अमित साधनं... या सिनेमात  तो आदित्य ठाकरेच्या भूमिका वठवतोय, असं म्हटलं जातंय. सिनेमात यामी गौतम, रोहित रॉय, सुप्रिया पाठक, जॅकी श्रॉफ आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.