अभिनेता संजय दत्तविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा अडचणीत सापडलाय. संजय दत्तविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलाय. 

Updated: Apr 15, 2017, 10:37 PM IST
अभिनेता संजय दत्तविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा अडचणीत सापडलाय. संजय दत्तविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलाय. 

सिनेनिर्माता शकील नूरानीला धमकावल्याप्रकरणी संजय दत्तला वॉरंट जारी करण्यात आलाय. मुंबईतील न्यायालयाने वॉरंट जारी केलंय.

हे प्रकरण १५ वर्षे जुने आहे. २००२मध्ये शकील नूरानी 'जान की बाजी' हा सिनेमा करत होते. यासाठी संजय दत्तला ५० लाख रुपये देत साईन केले होते. सिनेमाचे शूटिंगही सुरळीत चालू होते. 

मात्र अचानक संजयने मध्येच हा सिनेमा सोडला. संजय दत्तने मध्येच सिनेमा सोडल्याने नूरानीला पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी नूरानी यांनी संजयशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संजयने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नूरानी यांनी संजयविरोधात खटला दाखल केला होता.