काळवीट शिकार प्रकरण, सलमान खानची नवी मागणी

 काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला झालेल्या शिक्षेला सध्या स्थगिती आहे. या शिक्षेवरील स्थगिती कायम रहावी यासाठी सलमान खाननं सुप्रीम कोर्टात नुकतंच एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

Updated: Aug 27, 2014, 11:46 AM IST
काळवीट शिकार प्रकरण, सलमान खानची नवी मागणी title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला झालेल्या शिक्षेला सध्या स्थगिती आहे. या शिक्षेवरील स्थगिती कायम रहावी यासाठी सलमान खाननं सुप्रीम कोर्टात नुकतंच एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय.

देशातल्या सर्वात जास्त टॅक्स भरणा-यांपैकी आपण एक आहोत आणि आपलं काम सुरु ठेवण्यासाठी चित्रपटांच्या शुटिंगसाठी आपल्याला जगभर प्रवास करावा लागतो. त्यामुळेच आपल्या शिक्षेवर असलेली स्थगिती कायम ठेवावी असं सलमाननं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

सलमानचा हा खटला पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.