महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलं

 'सैराट' मराठी सिनेमा रिलीज झाल्यानंतर आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने प्रत्येकाच्या मनात घर केले. आर्ची-परशा जोडीला तरुणाईने डोक्यावर घेतलं. आता तर महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलंय. या साडीचे क्रेझ वाढत असून सोशल मीडियावर आर्चीचे छायाचित्र किनार असलेल्या साडीचा फोटो व्हायरल होत आहे.

Updated: Jun 23, 2016, 10:59 AM IST

मुंबई : 'सैराट' मराठी सिनेमा रिलीज झाल्यानंतर आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने प्रत्येकाच्या मनात घर केले. आर्ची-परशा जोडीला तरुणाईने डोक्यावर घेतलं. आता तर महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलंय. या साडीचे क्रेझ वाढत असून सोशल मीडियावर आर्चीचे छायाचित्र किनार असलेल्या साडीचा फोटो व्हायरल होत आहे.

नको मला गाडी-माडी, हवी मला आर्चीची साडी, अशीच काही महिलांची स्थिती झालेय. महिलांमध्ये आर्चीच्या साडीचे क्रेझ वाढतेय. महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलं आहे. माहेरच्या साडीनंतर आर्चीची किनार असलेली साडी महिलांना भुरळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, ही फोटो शॉपची कमाल आहे की नक्की साडी आहे, याबाबत अधिकृत समजू शकलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.