बॉक्स ऑफिसवर ‘बागी’चा जलवा

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा ‘बागी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या सोमवारी शाहरुख खानच्या फॅनपेक्षाही अधिक कमाई केली.

Updated: May 3, 2016, 01:40 PM IST
बॉक्स ऑफिसवर ‘बागी’चा जलवा title=

मुंबई : टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा ‘बागी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या सोमवारी शाहरुख खानच्या फॅनपेक्षाही अधिक कमाई केली.

या चित्रपटाने अपेक्षेपेक्षाही अधिक कमाई केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या चित्रपटाने आतापर्यंत ४५.३० कोटी रुपये कमावलेत. अद्यापही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.

वीकेंडचा रिपोर्ट पाहिला असता वीकेंडमध्ये सगळ्यात जास्त कमाई कऱणाऱ्या चित्रपटांमध्ये बागीचा तिसरा नंबर लागतो. ‘बागी’च्या आधी अक्षय कुमारची एअरलिफ्टने वीकेंडमध्ये ४४.३० आणि शाहरुखच्या फॅनने ५२.३५ कोटींची कमाई केली.

‘बागी’ने फॅनलाही टाकले मागे

‘बागी’ने पहिल्या सोमवारी ६.७२ कोटींचे कलेक्शन केले. तर शाहरुखच्या फॅनने पहिल्या सोमवारी ६.५ कोटी कमावले होते.